Wednesday, August 1, 2007

आज माझं मन मला म्हणालं

आज माझं मन मला म्हणालं
चल दोघ सागरतटी जाऊया
ती नसली तर काय झालं
आपण दोघंच प्रेमळलाटी वाहुया
निर्मळ लाटा निरखत
बेधुंद गाणी गाऊया

आज माझं मन मला म्हणालं
चल सागरतटी जाऊया
तु गहीरा की हा सागर गहीरा
आज दोघांची परीक्षा घेऊया
रात्रभर थांबुन आपणही
चांदण्याच्या संगतीने लहरी
चंद्रावर पहारा देऊया

आज माझं मन मला म्हणालं
चल सागरतटी जाऊया
तुझ्या आसवांची या
लहरींशी झुंज लाऊया
कोण जिंकतय कोण हरतय
आज दोघांची ताकद पाहुया
पाऊस बरसला जरी आता वेदनेचा
घाबरु नकोस तु मैत्रीची वळचण
आपण कुठंतरी शोधुया

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home