Friday, July 20, 2007

आयुष्यात प्रेम करायचय मला..

♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
आयुष्यात प्रेम करायचय मला..

दुर कुठेतरी समुद्र किनारी हातात हात घालून बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला...

माझ्या मांडीवर डोके ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला...

तिच्या सोबत थोडं दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवे पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला...

आयुष्यतील माझं शिखर तिच्या सोबतीने चढायचय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीचा आनंद तिच्या डोळ्यांतून व्यक्त झालेला अनुभवायचाय मला...

ती माझ्यापासून दूर जात आसताना ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यांवाटे मुक्त करायचय मला,
तिच्या सोबत माझे आयुष्य झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला...

आयुष्यात प्रेम करायचय मला....
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥

5 Comments:

Blogger phondekar.kalpesh said...

खुप सुंदर कविता आहे...
खुप छान तयार केला आहे...Blog.
माझा Blog कुठून मिळाला?

September 3, 2007 at 4:17 AM  
Blogger सोनल देशपांडे said...

छान कविता केली आहेस. कवितांना शब्द आणि यमक कसं सुचतं गं? आणि तुझ्या अड्ड्यावर नक्की जॉईन होईन. :-)

September 4, 2007 at 1:05 AM  
Anonymous Anonymous said...

ekdam zakaas kavita...!

lai best...!

August 1, 2009 at 5:50 AM  
Blogger Kiran said...

Khup Premal Kavita Aahe...........
Kiran

March 7, 2010 at 4:04 AM  
Blogger pradnya said...

Too...Sweet & Too Good.This is something amezing....

July 29, 2010 at 2:12 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home