Friday, July 20, 2007

तुझ मन, माझ मन

तुझ मन, माझ मन एकमेकांशी जुळु दे, मैत्री नावाचं नवं नातं मनी आपल्या रुळू दे.... मैत्री तुझी माझी.... तुझ्या मनाला मझ्या मनाचा रस्ता छान कळू दे मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग ओंजळ पूर्ण भरुदे.... नातं मैत्रीचं मैत्री म्हणजे तुझ मन आपोआप मला कळण मैत्री म्हणजे माझ्या मनाचं नातं तुझ्या मनाशी जुळणं.... मैत्री.... मैत्री म्हणजे, आपल्या विचांरात सतत कुणीतरी येण असतं मैत्री म्हणजे, न मागता समोरच्याला भरभरुन प्रेम देण असतं.... गंध मैत्रीचा...... मैत्रीचं नातचं नाजूक फुलासारखं अलगत फुलणारं आणि एकदा फुलुन आल की जन्मभर गंध देत झुलणारं....... मित्र... केव्हातरी,कुठेतरी मन होत हळूवारं मित्राकडे उघडतं मगं आपल्या भावनांच दार आपण होत जातो भरुन भरुन व्यक्त समोरची व्यक्ती ऎकत असते तेव्हा आपलच म्हणणं फक्त सलाम मैत्रीला..... मैत्री या शब्दावरचं माझं मनापासून प्रेम आहे आणि तुझसुध्दा अगदी माझ्यासारखं सेम आहे.... बात मैत्रीची... तुझ्याशी मैत्री म्हणजे वेगळीच बात आहे, कारण.. सुख आणि दुःखात आपल्या दोघांची साथ आहे....... चांदण मैत्रीचं... मैत्रीचं

आयुष्यात प्रेम करायचय मला..

♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
आयुष्यात प्रेम करायचय मला..

दुर कुठेतरी समुद्र किनारी हातात हात घालून बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला...

माझ्या मांडीवर डोके ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला...

तिच्या सोबत थोडं दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवे पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला...

आयुष्यतील माझं शिखर तिच्या सोबतीने चढायचय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीचा आनंद तिच्या डोळ्यांतून व्यक्त झालेला अनुभवायचाय मला...

ती माझ्यापासून दूर जात आसताना ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यांवाटे मुक्त करायचय मला,
तिच्या सोबत माझे आयुष्य झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला...

आयुष्यात प्रेम करायचय मला....
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥

तुझ्या मैत्रीची सावली....

तुझ्या मैत्रीची सावली....
सावली...
तुझ्या चेहऱ्याची सदैव दिसे नजरेत मला
सावली...
तुझ्या शब्दांची सदैव आठवे भुतकाळ मला
सावली...
तुझ्या हाताच्या स्पर्शाची सदैव जाणवे खांद्यावर मला
सावली...
तुझ्या एका हाकेची सदैव धिर दीई मला
सावली...
तुझ्या हास्याची सदैव हसवी मला
सावली...
तुझ्या सुखाची सदैव आनंदात ठेवी मला
सावली...
तुझ्या दुःखाची सदैव अश्रु देई मला
सावली...
तुझ्या अस्तित्वाची सदैव सोबत नेई दुर मला....
आनंदाचे सारे क्षण एकमेकांकडे हसत बघताना
आयुष्यातले सारे क्षण तुझ्या मैत्रीच्या सावली सोबत जगताना

Thursday, July 19, 2007

मैत्री ही मोठी अजब चीज आहे

मैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात. प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो. दैनंदिन जिवन जगताना ही मैत्री मग आपले अस्तित्व दाखवेलच असेही नाही. पण काही हरकत नसते

http://www.musiconnet.com/

Monday, July 16, 2007

गालावर खळी........

गालावर खळी......

गालावरी खळी डोळ्यात धुंदि
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका ईशा-याची
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

कोणताहा मौसम मस्त रंगाचा
तुझ्यासवे माझ्या जिवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धूंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाहि मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली
मला जिंदगीही घेऊनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदि
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची मज आता येई मजा
तू माझे जिवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला
बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे